पतंगशाह कुटीर रुग्णालयात आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप


पतंगशाह कुटीर रुग्णालयात आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप

Oplus_16908288
Oplus_16908288

.

जव्हार प्रतिनिधी :-

(दि. १ जून) : विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. हरिश्चंद्र सखाराम भोये यांच्या वाढदिवसानिमित्त पतंगशाह कुटीर रुग्णालय, जव्हार येथे सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
समाजातील गरजू व आजारी रुग्णांप्रती संवेदनशीलता जपत आयोजित या कार्यक्रमात जिल्हाध्यक्षा भाजपा आदिवासी मोर्चा पालघर जिल्हा सौ. ज्योतीताई हरिश्चंद्र भोये यांनी पुढाकार घेतला. यावेळी जव्हार नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. कुणाल उदावंत, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. सुरेखाताई थेतले, सरपंच श्री. जितेश भोये यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच जव्हार नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा शुभेच्छा दिल्या.
आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ उत्सव न साजरा करता समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक जाणीव जपली जात असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पसरत असून सामाजिक ऐक्य अधिक बळकट होत आहे.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!