पालघर नगर परिषदेत
नगराध्यक्ष पदासाठी
वकील राहुल ठाकरे यांची अपक्ष उमेदवारी जाहीर
पालघर – आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबत ठाकरे हे नगराध्यक्षासाठी अपक्ष म्हणून निवडुकीत उभे आहेत. शहरातील परिचित कायदेपंडित ऍड. राहुल ठाकरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी जाहीर करताच स्थानिक राजकारणात चर्चांना नवीन वळण मिळाले आहे.
ऍड. ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,
“ही निवडणूक ही पक्षपाती राजकारणापेक्षा लोकाभिमुख विकासाचा संघर्ष आहे. पालघरच्या सर्वसामान्य नागरिकांना विश्वास देणारे, पारदर्शक प्रशासन देण्यासाठी मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे.”
शहर व्यवस्थापनातील वाढती समस्या – पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वाहतूक, भुमाफिया नियंत्रण व भ्रष्टाचाराविरुद्ध मजबूत भूमिका घेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. अपक्ष म्हणून मैदानात उतरत असल्याने पक्षीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना ऊत आला आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये त्यांची वकीली पार्श्वभूमी, निर्भीड भूमिका आणि विकासाबाबतचा सरळ दृष्टिकोन यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

